महिलांसाठी दिलासादायक बातमी – आता व्यवसायासाठी मिळणार 40 हजारांचे कर्ज!

Advertisements

राज्य सरकारकडून महिलांसाठी एक आनंददायक घोषणा करण्यात आली आहे – मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत आता पात्र महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी ४०,००० रुपयांचे कर्ज मिळणार आहे.

या योजनेतून सध्या महिलांना दरमहा १५०० रुपये मिळतात. विशेष म्हणजे सरकारने यामध्ये आणखी ६०० रुपयांची वाढ जाहीर केली आहे. म्हणजेच लवकरच महिलांना २१०० रुपये मिळू लागतील.

व्यवसायासाठी कर्ज, आणि परतफेड हफ्त्यांमधून

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की या योजनेच्या लाभार्थी महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी ४० हजार रुपयांचे कर्ज मिळेल. याची परतफेडही सहज शक्य होईल, कारण ती दरमहा मिळणाऱ्या योजनेच्या हफ्त्यातूनच केली जाईल.

ग्रामीण महिलांना मोठा आधार

खास करून ग्रामीण भागातील अनेक महिलांना फक्त आर्थिक अडचणींमुळे व्यवसाय सुरू करता येत नाही. अशा महिलांसाठी ही योजना मोठा आधार ठरणार आहे.

तुमच्या घरातील महिलेला लाभ होतोय का?

जर तुमच्या घरातील महिला माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी असतील, तर त्यांना ही माहिती नक्की द्या. कारण केवळ योजना चालू असलेल्या महिलांनाच हे कर्ज दिले जाणार आहे. जे महिलांना अजून हफ्ता मिळत नाही, त्यांना सध्या तरी कर्जाचा लाभ मिळणार नाही.

योजना राबविण्याबाबत लवकरच सूचना येणार

ही कर्ज योजना कशी राबवली जाणार, यासंदर्भातील सविस्तर माहिती लवकरच दिली जाणार आहे. सद्यस्थितीत ही माहिती नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील चव्हाणवाडी येथे झालेल्या कार्यक्रमात अजित पवार यांनी दिली.

सावधगिरी आवश्यक – पात्र असूनही हफ्ता थांबला आहे का?

काही महिलांना योजनेचे काही हफ्ते मिळाल्यानंतर मध्येच थांबले आहेत. यामागे कारणे विविध असू शकतात – जसे की घरात चारचाकी वाहन असणे, कुणी कर भरणे इ. अशा परिस्थितीत शासनाने अटी अधिक कडक केल्या आहेत.

पण तुम्ही पात्र असूनही हफ्ता बंद झाला असेल, तर लगेच तक्रार सादर करा. तक्रार करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

Leave a Comment